रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. तिने एक स्टायलिश आणि हटके षटकारही मारला, या षटकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कर्णधार स्मृती मानधनाने शानदार अर्धशतक झळकावले. कर्णधारपदाची खेळी करत तिने एकटीने संघाला विजयाकडे नेले. या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सने परभाव केला.