Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!

देशात असे एक मंदिर आहे जिथे कल्की अवतारात गणेशाची पूजा केली जाते. तुम्हीही गणेश भक्त असाल तर या गणेशोत्सवानिमित्त या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. या मंदिराविषयी अनेक रंजक गोष्टी प्रचलित आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 14, 2024 | 09:54 AM
देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!

देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!

Follow Us
Close
Follow Us:

सध्या गणेशोत्सवनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि प्रसन्नाचे वातावरण आहे. लंबोदर, गणपती, विनायक, एकदंत, विघ्ननाशक आणि विनायक अशा विविध नावानी गणेशाला ओळखले जाते. देशात गणेशाची अनेक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी एक वेगळी पौराणिक कथा आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असे एक मंदिर आहे जिथे जिथे भगवान विष्णूंचे 10 वे अवतार मानल्या जाणाऱ्या ‘कल्कि’ अवतारात भगवान गणेशाची पूजा केली जाते. हे मंदिर देशातील फार प्रख्यात मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराबाबतच्या अनेक गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. चला तर याविषयीच आज सविस्तर जाणून घेऊयात.

कुठे आहे कल्की गणेश मंदिर?

कल्की गणेश मंदिराविषयीच्या अनेक रंजक गोष्टी प्रचलित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील मदन महलच्या रतन नगरमध्ये कल्की मंदिर वसलेले आहे. कल्की गणेश मंदिराला ‘सुप्तेश्वर गणेश मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 311 किमी आणि विदिशापासून सुमारे 261 किमी अंतरावर आहे.

हेदेखील वाचा – दुसऱ्या शहरात कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेह रेल्वेने नेता येईल का? काय नियम आहेत? जाणून घ्या

कल्की मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी?

कल्की मंदिराशी संबंधित एकाच नाही तर अनेक रंजक गोष्टी जोडलेल्या आहेत. हे देशातील एकमेव असे मंदिर मानले जाते, जेथे कल्कीच्या रूपात गणेशाची पूजा केली जाते. येथे भगवान गणेशाची 25 फूट विशाल खडकात विराजमान आहेत. हा महाकाय खडक सुमारे 100 चौरस फूट परिसरात आहे. येथील मंदिर परिसरात दिवे लावण्याची पद्धत आहे.

हेदेखील वाचा – झारखंडची ती नदी जिथे हिरे सापडतात! पाण्यात दडवलेल्या खजिन्याचे रहस्य जाणून घ्या

कल्की मंदिरात कसे जायचे?

  • कल्की मंदिरात जाण्यासाठी तुम्ही प्रथम मध्य प्रदेशातील कोणत्याही शहरातून जबलपूरला पोहोचू शकता
  • जबलपूरहून टॅक्सी, ऑटो आणि कॅब घेऊन कल्की गणेश मंदिर गाठू शकता
  • हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 311 किमी
  • विदिशापासून सुमारे 261 किमी अंतरावर आहे
  • या दोन्ही ठिकाणांहून रेल्वे, बस किंवा टॅक्सीने कल्की गणेश मंदिरात जाता येते

भाविकांची श्रद्धा

कल्की गणेश मंदिर हे देशातील पवित्र मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराविषयी असे म्हटले जाते की, जो व्यक्ती सिंदूर लावून खडकाची प्रदक्षिणा घालतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराविषयी आणखीन एक आख्यायिका अशी आहे की, जो भक्त 41 दिवस मंदिराजवळ दिवा लावून पूजा करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. यामुळेच येथे अनेक भाविक दिवा लावण्यासाठी येत असतात.

या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीच्या दिवशी इथे भाविकांची फार गर्दी दिसून येते. गणेश उत्सवानिमित्त या मंदिराला दिव्यांनी आणि फुलांनी सजवले जाते. या प्रसंगी इथे प्रचंड जल्लोष पाहायला मिळतो. इथे खाद्यपदार्थांचे स्टॉलदेखील लावण्यात येते.

Web Title: Anesh chaturthi 2024 travel marathi news kalki ganesha temple worshiped ganesha know intresting facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 09:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.