महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणे
सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेकांच्या भटकंतीला सुरवात होते. या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. त्यामुळेच ठिकठिकाणाहून पर्यटक सुंदर ठिकाणांना एक्सप्लोर करत असतात. पावसाच्या या मनमोहक वातावरणात महाराष्ट्रातील निसर्गमय ठिकाणे तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. या ठिकाणांचे सौंदर्य स्वर्गाहून काही कमी नाही. आपल्या कामाच्या व्यापातून कुठे शांत आणि निसर्गमय ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजच्या यादीतील बहारदार ठिकाणांना भेट द्यायला अजिबात मिस करू नका.
आज आम्ही तुम्हला महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणांविषयी आहोत, जी प्राचीन धबधबे, किल्ले आणि उंच पर्वतांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. मुंबईत राहणाऱ्या लोकांना या शहरांच्या आसपासची ठिकाणे हिमाचल आणि उत्तराखंडच्या कोणत्याही हिल स्टेशनपेक्षा कमी नाहीत. आज आम्ही तुम्हाला इगतपुरीतील काही उत्तम ठिकाणांविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.
हेदेखील वाचा – ‘हज यात्रे’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखर देशभरात आपल्या सर्वोत्तम उंचीसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण दरवर्षी अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत. या शिखरावरून आजूबाजूचा निसर्ग सुंदर आणि नयनरम्य व वाटतो. तुम्ही इथे ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. हे शिखर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
इगतपुरीतील सुंदर आणि नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे कसारा घाट. या ठिकाणी तुम्हाला सर्वत्र डोंगरदऱ्या आणि हिरवळ दिसेल. इथले सौंदर्य काही स्वर्गाहून कमी नाही. या ठिकाणाभोवती असलेले धबधबे अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. जर तुम्हाला मुंबईपासून दूर कोणत्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणची निवड करू शकता.
इगतपुरीतील हे धरण एक पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. विकेंडला स्थानिक लोक किंवा अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह आणि मित्र-मैत्रिणींबरोबर या ठिकाणी येऊन आपल्या ट्रिपचा मनसोक्त आनंद घेतात. इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आपला वेळ घालवू शकता.