Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायचीय? मग भारतातील ‘या’ डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या

Honeymoon Destinations: तुम्हाला तुमची हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायची असेल, तर भारतातील या सुंदर ठिकाणांची निवड तुम्ही करू शकता.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 26, 2024 | 04:12 PM
Honeymoon Destinations: हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायचीय? मग भारतातील 'या' डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या

Honeymoon Destinations: हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायचीय? मग भारतातील 'या' डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

सणांचा उत्साह ओसरल्यानंतर लगेच लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे आणि नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमूनची तयारी महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमची हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायची असेल, तर भारतातील या सुंदर ठिकाणांची निवड तुम्ही करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता. आज आपण भारतातील पाच सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्सची बद्दल जाणून घेणार आहोत. ही ठिकाणे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला नक्कीच आवडतील.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हटले जाते. नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी पहिली पसंती जम्मू आणि काश्मीर असते. हिवाळ्यात, काश्मीर बर्फाच्या दाट चादरीने झाकलेले असते. यामुळे काश्मिरचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलते. काश्मिरमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुंदर हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता. तसेच, साहसप्रेमी जोडप्यांसाठी स्कीइंग आणि स्नो बोर्डिंग सारखे उपक्रम उपलब्ध आहेत. काश्मीरच्या सुंदर दऱ्या, शांत तळी आणि बर्फाच्छादित पर्वत रांगा तुम्हाला मोहून टाकतील.

औली, उत्तराखंड

उत्तराखंडमधील औली हे ठिकाण हिवाळ्यात नवविवाहितांसाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे. औलीमधील बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य दृश्ये आणि रोमँटिक वातावरण हे हनिमूनसाठी परिपूर्ण आहेत. जोशीमठ, पांडुकेश्वर आणि गोपेश्वरच्या टेकड्यांवरून तुम्ही सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त तुमच्या जोडीदारासोबत पाहू शकता. औलीमधील बर्फात मस्ती करताना तुम्ही चविष्ट गढवाली पदार्थांचाही आस्वाद घेऊ शकता.

अंदमान निकोबार

अंदमान निकोबार बेटं आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. या बेटावर शांत निळे पाणी, पांढरी वाळू आणि भरपूर हिरवळ तुमच्या हनीमूनसाठी योग्य ठरतील. नवविवाहित जोडप्यांमध्ये हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू इच्छित असाल तर अंदमान निकोबारमध्ये हनिमूनची योजना करा. साहसप्रेमींसाठी स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग सारखे उपक्रम या ठिकाणी आहेत.

मुन्नार, केरळ

केरळमधील मुन्नार हे नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमून डेस्टिनेशन म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या हिलस्टेशनचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मुन्नारमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चहाच्या बागा, भरपूर हिरवळ आणि अनेक सुंदर दृश्ये पाहू शकता. तुम्ही नयनरम्य दऱ्यांमध्ये ट्रेकिंगसाठीही जाऊ शकता.

उटी, तामिळनाडू

उटी हे दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या शहराला हिल स्टेशन्सची राणी असे म्हणतात. उटीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत परफेक्ट हनिमूनचा आनंद घेऊ शकता. तुम्ही प्रसिद्ध टॉय ट्रेनमध्ये सफर करू शकता आणि येथे विविध निसर्गरम्य ठिकाणांचे दर्शन घेऊ शकता.

भारतातील ही पाच ठिकाणं तुमच्या हनिमूनला अविस्मरणीय बनवतील. प्रत्येक ठिकाणाचे वेगळेपण आणि सौंदर्य तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांना खास बनवेल.

Web Title: Best honeymoon destinations in india nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 04:12 PM

Topics:  

  • honeymoon destintions
  • india

संबंधित बातम्या

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा
1

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार
2

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
3

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.