रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करण्यात अडचणी येत आहेत? मग या प्रो टिप्स करतील तुमची मदत
भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. आजकाल बहुतेक लोक हे प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. प्रवासासाठीचा हा एक जलद आणि कमी खर्चिक पर्याय आहे, ज्यामुळे लोक अधिकतर रेल्वेने प्रवास करण्याचा अधिक प्राधान्य देतात. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. आता रेल्वेने प्रवास करायचे म्हटले की आपल्याकडे तिकीट असणे फार गरजेचे असते. रेल्वे नियमांनुसार, कोणताही प्रवासी हा रेल्वे तिकिटाशिवाय प्रवास करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचे असेल तर तुमच्याकडे तिकीट असणे अनिवार्य आहे.
आता बरेच लोक लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करत असतात. अशावेळी तत्काळ तिकीट बुकिंग हा योग्य पर्याय आहे. मात्र तत्काळ तिकीट मिळवणे काही सोपे नाही. बऱ्याचदा ते लवकर मिळत नाही. अशात आता तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या काही लहान चुकांमुळे तुमचे तिकीट लवकर कन्फर्म होत नाही आणि वेटिंग लिस्टमध्ये जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. चला या टिप्सविषयी जाणून घेऊयात.
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
IRCTC मोबाईल ॲपचा वापर करा
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
इंटरनेटची आवश्यकता
नेहमी लक्षात ठेवा की, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी फास्ट इंटरनेट असणे फार गरजेचे आहे. हे तपासण्यासाठी तुम्ही पिंग टेस्ट रन करू शकता. यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन meter.net वापरू शकता. जर पिंग 100ms पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ कनेक्शन हळू आहे. अशावेळी चांगले सिग्नल असलेल्या भागात जा किंवा वायफाय वापरा.
ऑटो अपग्रेडेशन निवडा
तिकीट बुकिंग करताना जर तुम्हाला कन्फर्म तिकीट हवे असेल तर तर प्रवाशांच्या डिटेल्समध्ये ‘ऑटो अपग्रेडेशन’ पर्यायावर क्लिक करा. असे केल्याने, जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केले आणि तिकीट उपलब्ध नसेल तर तुम्हाला एसी क्लासच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली जाईल, ज्यामुळे तुम्ही ते लगेच अपग्रेड करू शकता.