आता रेल्वे तिकिटासाठी 120 दिवसांआधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीमधील नवीन बदल जाणून घ्या
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. नोकरीनिमित्त आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना सणाच्या वेळी आपल्या घरी जायचं असत. यासाठी अनेक भारतीय प्रवासी रेल्वेचा मार्ग निवडतात, कारण हा सर्वात स्वस्त आणि वेगवान पर्याय आहे. मात्र ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. एखादा सण आला की रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. यासाठी अनेक लोक 3-4 महिन्यांआधीच हे रेल्वेचे तिकीट बुक करून ठेवतात. मात्र आता तुम्ही असे करू शकत नाहीत. कारण आता ॲडव्हांस तिकीट बुकिंग प्रणालीत काही नवीन बदल करण्यात आले आहेत.
रिझर्वेशन तिकिटामध्ये करण्यात आले आहेत बदल
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा आपल्या नियमांत नवनवीन बदल घडवून आणत असते. हे बदल कधी प्रवाशांच्या सोयीचे ठरतात तर कधी प्रवाशांना याच काहीच फायदा न होताना दिसून येतो. पूर्वी प्रवाशांना 120 दिवस म्हणजेच 4 महिन्यांआधीच रेल्वेचे तिकीट बुक करायचे जेणेकरून त्यांना कन्फर्म तिकीट मिळेल. मात्र आता प्रवाशांना आता असे करता येणार नाही. तिकीट तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये झालेले नवीन बदल जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा! इथली लोक मृतदेहांच्या हाडांपासून सूप बनवून पितात, कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हाथ
काय आहे नवीन बदल
नुकतेच केलेल्या तिकीट बुकिंगच्या बदलानुसार, आता प्रवाशी 120 दिवसांआधी नाही तर 60 दिवसांआधी तिकीट बुक करू शकतात. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता जर तुम्ही 4 महिन्यांआधीच रेल्वेचे तिकीट बुक केले तर तुम्हाला फक्त 2 महिन्यांचा वेळ मिळेल. रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, आता तुम्ही पुढील दोन महिन्यांसाठी तिकीट बुक करू शकणार आहात. हा नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. मात्र याचा 31 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही.
हेदेखील वाचा – जगातील सर्वात भयानक जमात! इथे तरुण झाल्यावर महिलांचे ओठ कापले जातात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये का बदल करण्यात आला?
तर झाले असे की, 4 महिन्यांआधीच बुक केलेली अधिकाधिक तिकिटे ही रद्द होत होती. लोक 4 महिने अगोदर त्यांच्या सीट कन्फर्म करायचे, पण प्रवासाची वेळ जवळ आली की काही कारणास्तव ते रद्द करून टाकत असे. मात्र यामुळे इतर प्रवाशांना तिकीट मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळेच रेल्वेच्या नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आले, ज्यानुसार आता लोकांना या 2 महिन्यांत प्रवास करायचा आहे की नाही हे निश्चित करावे लागेल. यामुळे आता अधिक तिकीट रद्द होणार नाहीत. त्याचप्रमाणे रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या रिफंडच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.