Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर

तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक असे अनोखे रेल्वे स्टेशन आहे जे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे.विशेष म्हणजे इथे ट्रेनचे इंजिन राजस्थानात आहे, तर डबे मध्य प्रदेशात उभे आहेत. एवढेच काय तर या रेल्वे स्थानकावर एक हिंदी चित्रपटदेखील बनवण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाशी जोडलेल्या काही रंजक बाबी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2024 | 09:08 AM
दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर

दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

भारत हा एक मनोरंजक आणि रोचक देश आहे. इथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला धक्का बसतो. अलीकडेच अमिताभ बच्चनच्या केबीसी शोचा एक एपिसोड व्हायरल होत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन एका स्पर्धकाला मोठ्या उत्सुकतेने भवानीमंडीबद्दल विचारत आहेत. या जागेत इतकं काय खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो, भवानी मंडी हे भारतातील एक असे रेल्वे स्टेशन आहे, जिथे अर्धी ट्रेन एका राज्यात आणि अर्धी ट्रेन दुसऱ्या राज्यात थांबवली जाते.

अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच अनेकांनी या ठिकाणाचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. हे शहर जितके अनोखे आहे, तितकेच इथले रेल्वे स्टेशनही अप्रतिम आहे. चला तर मग भवानी मंडी रेल्वे स्टेशनबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Travel: गुजरातची ती प्राचीन नदी जी हाडे वितळवते, इथे स्नान केल्याने कुष्ठरोगापासून आराम मिळतो

झालावाडमध्ये स्थित आहे स्टेशन

हे स्टेशन राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात येते. हे स्टेशन राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विभागलेले आहे. या स्टेशनची खास गोष्ट म्हणजे तिकीट देणारा मध्य प्रदेशात आणि तिकीट घेणारा राजस्थानमध्ये उभा आहे. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकाच्या एका टोकाला राजस्थानचा तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशचा साईन बोर्ड आहे, जो दुरूनच लोकांचे लक्ष वेधून घेतो.

दोन राज्यांचा एक बाजार

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इथे भवानी मंडी शहरात लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो, तर मागचा दरवाजा मध्य प्रदेशातील भैसोंडा मंडीत उघडतो. त्यामुळे दोन्ही राज्यातील लोकांमध्ये परस्पर प्रेम आणि सौहार्द दिसून येते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दोन्ही राज्यातील लोकांच्या बाजारपेठदेखील एकच आहे.

हेदेखील वाचा – UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या

भवानी मंडीवर बनला आहे चित्रपट

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, या रेल्वे स्टेशनच्या नावावर एक कॉमेडी फिल्म देखील बनवण्यात आली आहे, ज्याचे नाव भवानी मंडी स्टेशन असे आहे. या चित्रपटाची निर्मिती सय्यद फैसाद हुसैन यांनी केली आहे. जयदीप आल्हावतसारख्या कलाकारांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

दुर्घटना झाल्यावर करावी लागते तक्रार

भवानी मंडी रेल्वे स्टेशन दिल्ली मुंबई मार्गाच्या मध्यभागी आहे. येथून दररोज किमान 1000 प्रवासी प्रवास करतात. येथे येणाऱ्या गाड्यांची इंजिने राजस्थानात, तर डबे मध्य प्रदेशात उभी असतात. कोणतीही दुर्घटना घडल्यास, ज्या राज्यात इंजिन किंवा कोच उभा असेल तेथील पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते.

Web Title: Indian railway station that is divided into two states knows the interesting facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 09:08 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
1

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
2

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण
3

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
4

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.