Mahakumbh 2025: कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन, दिल्या जाणार खास सुविधा
12 वर्षांपासून भाविक ज्याची वाट पाहत आहेत त्या कुंभमेळ्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे. यंदाचं नवीन वर्ष हे खऱ्या अर्थाने खास असणार आहे. यावर्षी 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत असतात. त्यातच आता भाविकांचे महाकुंभाला जाणे आणखीन सोपे होणार आहे कारण न रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने महाकुंभासाठी 7 राज्यांतून विशेष गाड्या सुरु करणार आहे. भारतीय रेल्वेकडून याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. जर तुम्हीही कुंभमेळ्याला जाण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची असणार आहे. आता महाकुंभला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या सोईनुसार ट्रेन निवडू शकता.
भारत गौरव ट्रेन सुरु होणार
या महिन्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू असणार आहे. या महाकुंभाला जाण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने लोक तयारी करत आहेत. त्यामुळेच भारतीय रेल्वेने यासाठी काही विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने पुणे ते प्रयागराज अशी खास ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू केली आहे. ही विशेष ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये भाविकांना फक्त प्रवासच नाही तर जेवणाची आणि राहण्याची सुविधाही दिली जाणार आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल आणि महाकुंभला जाण्याचा विचार करत असाल तर ही ट्रेन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
फक्त 3 हजार रुपयांत हेलिकॉप्टरने देता येईल महाकुंभ मेळ्याला भेट, कुठून तिकीट बुक करावं? जाणून घ्या
तिकिटाची किंमत काय?
पुण्याहून प्रयागराजला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेनचे तिकीट बुक करणे आवश्यक आहे. याच्या किमतीबद्दल बोलणे केले तर, ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट 22,940 रुपयांचे आहे. तसेच याचे मानक वर्ग म्हणजेच 3AC तिकीट 32,440 रुपयांचे आहे. तुम्ही कन्फर्म तिकीट घेत असाल तर, कम्फर्ट क्लास 2AC तिकिटाची किंमत 40,130 रुपये आहे. या ट्रेनमध्ये 14 डबे आहेत, ज्यात 750 प्रवासी बसू शकतात. पुणे-प्रयागराज भारत गौरव रेल्वे मार्गामध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार?
पुणे ते प्रयागराजसाठी भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आयआरसीटीसीच्या (IRCTC) टेंट सिटीमध्ये प्रवाशांची सोय केली जाईल. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, एक सुरक्षा रक्षक आणि एस्कॉर्ट सेवा असेल. तुमच्या राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा यात केली जाईल. ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवण पुरवले जाईल.
एक असा किल्ला जिथे आजही अश्वत्थामा रोज भगवान शिवाची पूजा करण्यासाठी येतो, अद्वितीय आहे जागा
कुंभमेळ्यातील 2025 शाही स्नानाच्या तारखा
ट्रेन क्रमांक 04526- भटिंडा येथून धावेल
ट्रेन क्रमांक 04664- फिरोजपूर, पंजाब येथून धावेल
ट्रेन क्रमांक 04528 – हिमाचलच्या अंब अंदौरा येथून धावेल
ट्रेन क्रमांक- 04316- डेहराडूनहून धावेल
ट्रेन क्रमांक- 04662- अमृतसरहून धावेल
ट्रेन क्रमांक- 04066- दिल्लीहून धावेल