Char Dham Yatra: चार धाम यात्रेसाठी लाइव्ह टूर पॅकेज सुरू, किंमत काय असेल? कोणकोणत्या सुविधा मिळतील ते जाणून घ्या
चारधाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रा मानली जाते. या यात्रेत उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांचा (यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) समावेश होतो. ही यात्रा मुख्यतः मे महिन्यापासून सुरु होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेत सामील होण्यासाठी उत्तराखंडात येत असतात. चारधाम यात्रेच्या तिकिटासाठी भाविकांना फार त्रास सहन करावा लागतो. याचे तिकीट मिळवणे काही सोपी गोष्ट नाही.
उत्तर भारतातील ही ठिकाणी स्वर्गापेक्षा कमी नाहीत, तुम्ही केली आहेत का एक्सप्लोर
अनेक वेळा प्रचंड गर्दीमुळे काही काळ बुकिंग बंद होते. यामुळेच लोक चारधामला जाण्यासाठी आधीच तिकीट बुक करतात. यासाठी फक्त तिकीट बुक करणे पुरेसे नाही तर चारधामच्या प्रवासादरम्यान हॉटेल, तंबू सुविधांचीही आधीच पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळेच चारधामला जाताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी भारतीय रेल्वे घेते.
दिल्लीहून चारधाम यात्रा टूर पॅकेज
सर्वप्रथम, हे टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी, तुम्हाला महत्त्वाच्या तारखांची माहिती घ्यायला लागेल. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की, हे पॅकेज प्रत्येक दिवसासाठी नाही. या टूर पॅकेजसाठी काही तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या तारखांना तिकीट बुक करू शकता. तुम्ही 01, 15 मे, त्यानंतर 1, 12 आणि 24 जून, 1, 12 आणि 24 सप्टेंबर आणि त्यानंतर 1 आणि 15 ऑक्टोबर या तारखांची तुमचे तिकीट बुक करू शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना बद्रीनाथ/गंगोत्री/केदारनाथ/यमुनोत्री येथे नेले जाईल. हे पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना बसने प्रवास करावा लागेल.
किती असेल टूर पॅकेजची किंमत?
टूर पॅकेजमध्ये या सुविधा दिल्या जातील