भारतातील या जागा स्वर्गापेक्षा कमी नाहीत, तुम्हाला माहिती आहेत का नॉर्थ इंडियामधील ही काही खास ठिकाणं (फोटो सौजन्य - istock )
आला रे आला उन्हाळा आला आता मुलांना उन्हाळाच्या सुट्ट्या लागणार. उन्हाळा भरपूर लोकांना आवडत नाही. उन्हाळा आल्यावर सगळ्यांना थंडगार पदार्थांची ओढ लागते. थंड पाणी, ताक, कुलर, एसी, थंड ठिकाणे इत्यादी. उन्हाळ्यात बाहेर कुठे निघालो तर चीड चीड होते. घराबाहेर निघायची इच्छा होत नाही. मात्र जर मी असं म्हंटल की आपल्या भारतात अशी काही ठिकाण आहेत जे उन्हाळ्यात आपल्याला हिवाळ्याचा फील देतात. उत्तर भारत हा कडक उन्हाळ्यात चिल करण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. उत्तर भारतामध्ये अशी कोणकोणती ठिकाण आहेत यावर एकदा नजर टाका.
मार्च महिन्यापासूनच उन्हाळा सुरू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णता शिगेला पोहोचते. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला उमस आणि घामाचा त्रास होतो. म्हणूनच, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि मुलांसह सुट्टीच्या काळात उत्तर भारतातील या खास ठिकाणांना भेट देऊ शकता.
मनाली
खरंतर हिमाचल प्रदेशातील मनाली हे स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही मनालीपासून ५१ किमी अंतरावर असलेल्या रोहतांग तलावावर जाऊ शकता. येथे तुम्हाला मजेदार आणि साहसी खेळ करण्याची संधी मिळते. तुम्ही सोलांग व्हॅली पाहू आणि एक्सप्लोर करू शकता.
शिमला
हिमाचल प्रदेशचे मूळ शहर असलेल्या शिमलामध्ये तुम्ही कुफरी आणि मॉल रोडवर जाऊ शकता. शिमलापासून १६ किमी अंतरावर कुफरी आहे. कुफरी हे एक हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही बर्फावरील खेळ, ट्रेकिंग, घोडेस्वारी इत्यादींचा आनंद घेऊ शकता. किंवा तुम्ही शिमलाच्या मॉल रोडवर खरेदी देखील करू शकता.
नैनिताल
उत्तराखंडमधील नैनिताल हे येथे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही नैनी तलाव, स्नो व्ह्यू पॉइंट याचा आनंद घेऊ शकता असे सुंदर दृश्य तुम्हाला वेड लावू शकते.
मसुरी
उत्तराखंडच्या मसुरीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करू शकता. इथे केम्पटी फॉल्स, अनेक अशी ठिकाणे आहेत जे तुम्हाला वेड लावू शकतात. मसुरी असे ठिकाण आहे त्यात प्राकृतिक सौंदर्य सामावले आहे.
औली
जर तुम्हाला ट्रेकिंग आणि एडवेंचर स्पोर्ट्सची आवड असेल तर उत्तराखंडमधील औली हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही एडवेंचर्स एक्टिविटीजचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण स्नो लवर्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बर्फाच्या खेळांचा आनंद घेऊ शकता.
हे आहेत काही ठिकाणे जिथे तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाऊ शकता. आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू शकता.
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव