सौजन्य: सोशल मीडिया
IRCTC म्हणजेच भारतीय रेल्वे नेहमीच त्यांच्या प्रवाश्यांसाठी नवनवीन सहलीची पॅकेजेस आणत असतात. खिशाला परवडतील अशी पॅकेजेस IRCTC नेहमीच सर्वांना उपलब्ध करून देत असतात. आणि जास्तीतीत जास्त ठिकाणे फिरायला मिळतील अशी ही एक्ससायटींग पॅकेजेस असतात. जर तुम्ही देखील नोव्हेंबरमध्ये कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर IRCTC सोबत दक्षिण भारतात जाण्याचा प्लॅन नक्की करू शकता. IRCTC ने नुकतेच एक भन्नाट पॅकेज आणले आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये अनेक ठिकाणे फिरू शकता. या पॅकेजमध्ये हॉटेलपासून नाश्ता, प्रवास विमा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून याची बुकिंग करता येईल.
हे टूर पॅकेज कन्याकुमारी, मदुराई ते रामेश्वरम पर्यंत आहे. 6 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये राहण्याची सोय, भोजन आणि विमान तिकिटांचा समावेश आहे. पॅकेजशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
पॅकेजचे नाव- दक्षिण भारत टूर पॅकेज
कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
ट्रॅव्हल मोड – फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टिनेशन – कन्याकुमारी, कोवलम, मदुराई, रामेश्वरम, त्रिवेंद्रम
तुम्ही कधी प्रवास करू शकाल – नोव्हेंबर
कोणत्या सुविधा मिळतील
1. राहण्यासाठी हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
2. जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
3. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
प्रवासासाठी एकूण किती शुल्क आकारले जाईल ?
1. जर तुम्ही या प्रवासात एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 53,500 रुपये द्यावे लागतील.
2. दोन लोकांना प्रति व्यक्ती 40,800 रुपये द्यावे लागतील.
3. तीन लोकांना प्रति व्यक्ती 39,100 रुपये शुल्क भरावे लागेल.
4. तुम्हाला 5-11 वयोवर्ष्यांच्या मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी तुम्हाला 32,300 रुपये द्यावे लागतील. आणि बेडशिवाय तुम्हाला 29,000 रुपये द्यावे लागतील.
आयआरसीटीसीने ट्विट करून माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, जर तुम्हाला मदुराई, रामेश्वरम, कोवलम आणि कन्याकुमारीला जायचे असेल तर तुम्ही देखील IRCTC च्या या शानदार टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
कसे कराल बुकिंग ?
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.






