Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते 'होळी'
महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी हा भारतातील एक प्रमुख आणि लोकप्रिय सण आहे. होळीला “रंगांचा उत्सव” असेही म्हटलं जातं. कोकण, महाराष्ट्र, मुंबई, वृदांवन या सर्व भारतातील ठिकाणी होळीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, होळीचा सण केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील साजरा केला जातो.
होळी या सणामुळे केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्य देखील वाढते. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये होळीचा सण साजरा केला जातो. या देशांमध्ये नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मॉरिशस, फिजी यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारताचा शेजारी देश नेपाळ होळीचा सण “फागु” किंवा “फागु पौर्णिमा” म्हणून साजरी करतो. नेपाळमध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. नेपाळमध्ये होळीचा सण दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि अबीर लावून आनंद साजरा करतात. नेपाळमध्ये हा सण हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायांद्वारे साजरा केला जातो.
बांगलादेशातही होळीचा सण साजरा केला जातो, हा सण येथे “डोल जत्रा” किंवा “बसंत उत्सव” म्हणून ओळखला जातो. हा सण बांगलादेशातील हिंदू समुदाय साजरा करतो. या दिवशी लोक रंगांनी खेळतात आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात. बांगलादेशमध्ये होळीचा सण धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे.
पाकिस्तानमध्येही होळीचा सण साजरा केला जातो, जरी येथे हा सण प्रामुख्याने हिंदू आणि शीख समुदाय साजरा करतात. पाकिस्तानमध्ये होळी “होलिका दहन” आणि “रंगांचा उत्सव” म्हणून साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि मिठाई वाटतात. पाकिस्तानमध्ये होळीचा सण धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकता वाढवतो.
हिंदी महासागरात वसलेल्या मॉरिशस बेटावर असलेल्या देशातही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीला मॉरिशसमध्ये “फगवा” म्हणून ओळखले जाते. येथील लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मॉरिशसमध्ये होळीचा सण केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर तो येथील लोकांसाठी सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक देखील आहे.
महाकुंभमेळ्याला जाताय? केवळ त्रिवेणी संगमच नाही तर प्रयागराजमधील ‘या’ ठिकाणांनाही आवर्जून भेट द्या
पॅसिफिक महासागरात वसलेल्या फिजी बेट देशामध्येही होळीचा सण साजरा केला जातो. फिजीमध्ये होळीला “फगवा” किंवा “होली” म्हणून ओळखले जाते. येथील लोक हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. फिजीमधील हिंदू समुदाय होळीचा सण साजरा करतात आणि येथील लोक या दिवशी रंग खेळतात आणि मिठाई वाटतात.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये होळीला ‘फगवा’ म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीच्या प्रभावामुळे हा उत्सव येथे लोकप्रिय आहे.