Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

लडाखच्या सीमेवर वसलेले तुरतुक हे भारतातील शेवटचे गाव मानले जाते. बाल्टी संस्कृती, निसर्गरम्य दऱ्या आणि 1971 नंतर भारतात सामील झालेला इतिहास यामुळे हे गाव खास आकर्षण ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 08:21 AM
भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटच गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटच गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • लडाखच्या सीमेवर भारताचे शेवटचे गाव वसले आहे.
  • इथे निसर्गाचा सुंदर अनुभव घेता येतो.
  • कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.
भारतामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत जी अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहेत. काही गावे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत, तर काही इतिहास आणि संस्कृतीमुळे खास ठरतात. भारत-पाकिस्तान सीमेजवळ वसलेले एक असेच अनोखे गाव म्हणजे देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे तुरतुक. उंच डोंगररांगा, बर्फाच्छादित शिखरे आणि शांत वातावरण यामुळे हे गाव पर्यटकांना आकर्षित करते. लडाखच्या उत्तरेकडील टोकाला वसलेले हे गाव बाल्टी संस्कृतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

कोणते आहे हे गाव?

तुरतुक हे भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. डोंगर, हिरव्यागार दऱ्या, वाहणारी नदी आणि लहान झरे यांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे आहे. ट्रेकिंग आणि शांत पर्यटनासाठी येथे दूरदूरून लोक येतात. लडाखच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे याला विशेष ओळख मिळाली आहे.

भारतात कसे सामील झाले?

1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धानंतर हे गाव भारताच्या ताब्यात आले. त्यापूर्वी हे क्षेत्र बाल्टिस्तानचा भाग मानले जात होते. त्यामुळे आजही येथे बाल्टी परंपरा, भाषा आणि राहणीमान जपले गेले आहे. सीमेच्या अतिशय जवळ असल्यामुळे येथे सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. गावापुढे थांग नावाचे ठिकाण आहे, मात्र ते सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद आहे.

तुरतुकची खास वैशिष्ट्ये

  • येथे 16व्या शतकातील ऐतिहासिक मशीद पाहायला मिळते.
  • गावातील प्रसिद्ध पोलो ग्राउंड स्थानिक परंपरेचे प्रतीक आहे.
  • खुबानी (अप्रिकॉट)ची मोठ्या प्रमाणावर शेती येथे केली जाते.
  • बाल्टी हेरिटेज होम आणि बाल्टी संग्रहालयातून स्थानिक संस्कृतीची माहिती मिळते.
  • तुरतुक गोम्पा हे शांत आणि सुंदर बौद्ध स्थळ आहे.
  • सुमारे 2500 ते 3000 लोकसंख्या येथे राहते.
  • हॉटेल्स मर्यादित असली तरी स्थानिक होमस्टेची सोय उत्तम आहे.
1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

येथे कसे पोहोचावे?

तुरतुकला भेट देण्यासाठी विशेष परवानगी (इनर लाईन परमिट) आवश्यक आहे. प्रथम लेह येथे पोहोचावे लागते. लेहमधील जिल्हाधिकारी कार्यालयातून इनर लाईन परमिट काढावे लागते. हे परमिट साधारणपणे पाच दिवसांसाठी वैध असते. गावात प्रवेश करताना आणि परतीच्या वेळी हे परमिट सोबत ठेवणे आवश्यक आहे, कारण सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indias last village is located on the border of ladakh travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Ladakh
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
1

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
3

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.