लोहगड
प्रवास म्हटलं की त्यासाठी लागणारा खर्च हा आलाच. प्रवास नेहमी दूरचा करावा जेणेकरुन देशातिले अन्य ठिकणांचे भौगोलिक ज्ञान आणि अनुभव आपल्याला प्राप्त होतात. प्रवासाचे आरोग्याला अनेक फायदे असतात. यामुळे मन प्रसन्न होते आणि नवीन काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. प्रेत्येकाने आपल्या बोरिंग आयुष्यातून थोडा मोकळा वेळ काढा आणि कुठे तरी फिरायला पाहिजे. स्वतःला या कामाच्या कटकटीतून मुक्त करा आणि या विकेंडला सुट्टी काढून कुटुंबासोबत फिरायला नक्की जा.
आता फिरणे म्हटलं की, बजेट प्लॅनींग हा पहिला मुद्दा मनात येतो. देशातील राजस्थान हे राज्य अनेक सुंदर ठिकाणांची आणि रहस्यमय गोष्टींनी वेढलेले आहे. तुम्ही या सुट्टीत अगदी कमी पैशात राजस्थामधील एका सुंदर किल्ल्याला भेट द्यायला जाऊ शकता. किल्ले हे आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहेत. राजेशाही कालीन किल्ले आपला इतिहास मागे ठेवून चालत असतात. इथे तुम्हाला किल्ल्याचा अद्भुत इतिहास जाणून घेता येईल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत लोहगड किल्लयांविषयी. हा किल्ला प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक असून याचा इतिहास फार जुना आहे. सुट्टीत कुठे ऐतेहासिक ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट स्पॉट आहे.
लोहगड राजस्थान राज्यातील भरपूर जिल्ह्यात स्थित आहे. येथे जाण्यासाठी, तुम्हाला नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून पहाटेची ट्रेन मिळेल. ज्याचे भाडे 90 ते 600 रुपये आहे. तुम्ही फक्त 2 ते 3 तासात भरतपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचाल, जिथून किल्ला फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. याचाच अर्थ जर तुम्ही प्रवासाचे आणि जेवणाचे भाडे मोजले तर याचा खर्च 2000 रुपयांपेक्षाही कमी निघेल.
लोहगडला राजस्थानमधील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते, याची संरक्षण गुणवत्ता उत्कृष्ट मानली जाते. 18 व्या शतकात सम्राट सुरजमल या राजाने या किल्ल्याचे अनावरण केले होते. त्याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या आत ठेवण्यात आलेल्या संग्रहालयातही तुम्हालाही अनेक वास्तू पाहायला मिळतील.
राजस्थामध्ये अतिउष्णता असल्याकारणाने इथे उन्हाळ्यात जाणे चुकीचे ठरेल. त्यामुळे तुम्ही इथे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात या दोन्ही ऋतूत जाऊ शकता. यासाठी एक उत्तम रोजना आखा आणि मनसोक्त फिरतीची आनंद घ्या. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हंगाम फिरण्यासाठीचा योग्य काळ मानला जातो.