तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या केसांचा करोडोंमध्ये बिसनेस, सात पिढ्या बसून खातील एवढी जमते रक्कम
सध्या तिरुपती बालाजी मंदिर फार चर्चेत आहे. मागेच मंदिरतील प्रसादामध्ये भेसळ झाल्याचा मुद्दा फार व्हायरल झाला. भाविकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या प्रसादात तुपाऐवजी डुकराची चरबी, गोमांसचा वापर करण्यात आल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला होता. तिरुपती हे मंदिर आंध्र प्रदेशात वसलेले आहे. हे मंदिर तिरुपती बालाजीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर एक चमत्कारी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भगवान श्री हरी विष्णूच्या श्री व्यंकटेश्वर रूपाची पूजा केली जाते.
दररोज लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. तसेच अनेक भाविक या मंदिरात लाखोंची देणगी देखील देत असतात. त्यामुळेच या मंदिराला देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हटले जाते. अनेक भाविक तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन आपले केस दान करतात. ही एक श्रद्धा आहे. या मंदिरात केवळ पुरुषच नाही तर महिलाही नवस पूर्ण केल्यानंतर केस दान करतात. मात्र या केसांचे नंतर काय केले जाते माहिती आहे का? तिरुपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे काय केले जाते ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – या गावामुळे पुण्याच्या विमानतळाचे नाव बदलणार! संत तुकारामांच्या नावावर एयरपोर्टचे नवीन नाव…
तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याबाबत अशी प्रथा आहे की, या मंदिरात केस दान केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होतात. अनेक लोक सर्व वाईट आणि पापांचे प्रतीक म्हणून आपले केस दान करत असतात. तिरुपती मंदिरात दररोज सुमारे 20 हजार भाविक केस दान करून जातात. हे काम पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसरात सुमारे 600 न्हावी ठेवण्यात आले आहेत.
मंदिरात दान केलेल्या केसांचे पुढे काय होते असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे मात्र याचे उत्तर कोणाकडेच नाही. आम्ही तुम्हाला सांगतो सांगतो, तिरुपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचा करोडोंमध्ये लिलाव करण्यात येतो. दान केल्यानंतर केस वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवले जातात आणि त्यानुसार त्यांच्या किमतीही ठरविल्या जातात. या केसांच्या लिलावातून मंदिर ट्रस्टला करोडोंचे पैसे मिळतात. वर्षाला यातून मंदिर 1.50 रुपयांची कमाई करतो.
हेदेखील वाचा – दिल्ली विमानतळावर सुरू होणार देशातील पहिली एअर ट्रेन, जाणून घ्या आश्चर्यकारक वैशिष्ट्ये
लिलावापूर्वी केस पाच प्रकारात ठेवले जातात. केसांच्या लांबीनुसार त्यांना विविध प्रकारात मोडले जाते. काही वर्षापूर्वी सर्वोच्च दर्जाचे केस 22,494 रुपये प्रति किलो विकले गेले होते. तर यात कमी दर्जाचे केस 17,223 रुपये प्रति किलो दराने म्हणजेच क्रमांक 2 श्रेणीत केस विकले गेले. तृतीय श्रेणीचे केस 2833 रुपये किलो दराने विकले गेले. चौथ्या क्रमांकाचे केस 1195 रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले, तर ग्रेड पाचचे केस 24 रुपये किलो दराने विकले गेले. एवढेच काय तर पांढरे केसही 5462 रुपये किलो दराने विकले जातात.