फक्त काश्मीरच नाही तर भारतातील ही ठिकाणही स्वर्गाहून कमी नाहीत, दृश्य पाहताच प्रेमात पडाल
बहुतेकद असे म्हटले जाते की, पृथ्वीवर कुठे स्वर्ग बघायचा असेल तर तो फक्त काश्मीरमध्ये बघता येतो. येथील बर्फाच्छादित सौंदर्य अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असत. हे एक असे ठिकाण आहे जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असत. याचे मूळ कारण म्हणजे, इथले निसर्गमय सौंदर्य, बर्फाळ वातावरण, डोंगर जे दरवर्षी पर्यटकांना भुरळ घालत असतात. जेव्हा जेव्हा हिल स्टेशनचे नाव मनात येते तेव्हा तेव्हा बहुतेक लोकांना जम्मू-काश्मीर हे एकाच नाव मनात येते. जम्मू-काश्मीरचे सौंदर्य काही कमी नाही मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात अजूनही अशी काही ठिकाणे आहेत जी धर्तीवर स्वर्गाची अनुभूती देतात. या थंडीत तुम्हीही कुठे बाहेर जाण्याचा विचार केला असेल तर तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करू शकता.
तोष
हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले तोष हे ठिकाण देखील आपल्या सुंदर आणि अद्भुत सौंदर्यासाठी ओळखले जाते. हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 2 हजार मीटर उंचीवर वसलेले तोष हे ठिकाण जम्मू-काश्मीरच्या सौंदर्याला तोडीस तोड देते. इथे तुम्हाला अगदी काश्मीरसारखी सुंदर बर्फाच्छादित दृश्ये पाहायला मिळतील. इथल्या नद्या काचेप्रमाणे स्वछ असतात.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा: मृतदेह खणून बाहेर काढतात, मग नवीन कपडे घालून पाजतात सिगारेट, कारण काय?
औली
मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे औली देखील फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात तर या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच बहरते. उंच पर्वत, देवदाराची मोठी झाडे, गवताळ प्रदेश आणि तलाव आणि धबधबे औलीच्या सौंदर्यात भर घालतात. इथले सौंदर्य इतके मनमोहक आहेत की याला उत्तराखंडचे काश्मीर असे म्हटले जाते. इथली बहुतेक दृश्ये हुबेहूब काश्मीरसारखी वाटू लागतात.
हेदेखील वाचा – या देशांमध्ये अवघ्या 20 हजार रुपयांत करता येते विदेश यात्रा! लगेच तयारीला लागा
मेचुका व्हॅली
देशाच्या ईशान्य भागातही तुम्हाला निसर्गसौंदर्याचे एक अदभूत दृश्य पाहायला मिळेल. देशाच्या या भागात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या सौंदर्याने जम्मू-काश्मीरशी स्पर्धा करू पाहतात. अरुणाचल प्रदेशात स्थित मेचुका व्हॅली हे एक ठिकाण आहे जे ईशान्येचे काश्मीर मानले जाते. गवताळ प्रदेश, उंच उंच पर्वत, धबधबे आणि सुंदर तलाव या ठिकाणच्या सौंदर्याला आणखीन बहारदार बनवण्याचे काम करतात. मेचुका व्हॅलीमध्ये बर्फ पडत असल्याने या ठिकाणाने पांढऱ्या रंगाची चादर ओढल्याचे दिसून येते. दरवर्षी पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत असतात.