पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त झाले आहेत. यानंतर रहिवाश्यांचा आक्रोश पहायला मिळतोय. यात एका महिलेने बिल्डर मनोज जरे सोबत भाजपचे माजी महापौर राहुल जाधव वर गंभीर आरोप केलेत. मात्र माझा आणि भाजपचा ही मनोज जरेशी काही संबंध नाही, तो माझ्या भागातील असल्यानं मी त्यास ओळखतो. मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळं हे रहिवाशी माझ्याकडे आले. तेंव्हा हे बंगले अधिकृत करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं त्यांना आश्वासन दिलं होतं, म्हणून त्यांनी माझ्यावर रोष व्यक्त केला, असं जाधव म्हणालेत.