पोलिस दलामध्ये गुन्ह्याचा शोध, स्फोटके शोध तसेच अंमली पदार्थांच्या शोधासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली जाते. अनेक मोठ्या गुन्ह्याचा शोध श्वानामुळे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पोलिस दलात या श्वानाचे निवृत्तीचे वय दहा वर्ष असल्याने दर दहा वर्षांनी पोलिस दलात नव्या श्वानाची भरती होत असते. आज अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात नव्या श्वानाची भरती झाली असून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या श्वानाचे नामकरण केले असून या नव्या श्वानाला पोलिस दलात यापुढे ” ब्रावो ” या नावाने ओळखले जाणार आहे. ब्रावो हा सद्या ४५ दिवसांचा नर पिल्लू असून गुन्हे शोध या कामाकरीता पुण्यातून आणले आहे. पुढील ४ महिने त्याचे संगोपन करून पुढे ९ महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर ब्रावो जिल्हा पोलिस दलात गुन्हे शोध कामासाठी रुजू होणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. याबाबत ब्रावो चे सांभाळ करणारे उमेश गोसावी यांनी माहिती सांगितली आहे.