अहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. देवीचे मुख्य पुजारी भगत कुटुंबियांच्या हस्ते सकाळी विधिवत अभिषेक आणि महापूजा पार पडली. त्यानंतर मानाच्या घटांची तसेच धर्मध्वजाची पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.परंपरेनुसार बुऱ्हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर मानले जाते, तर तुळजापूर हे सासर मानले जाते. तब्बल ११०० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात दरवर्षी नवरात्रात हजारो भाविक हजेरी लावतात. आजच्या विधींमध्ये भगत कुटुंबियांसह अनेक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.