शिर्डीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा फ्लेक्स अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री फाडल्याची आणि दुचाक्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे समर्थकांनी संताप व्यक्त करत निषेध नोंदवला असून, पोलिसांकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, डॉ. विखेंनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, शिर्डीत भयमुक्त वातावरणासाठी आपण कटिबद्ध असून, जे कोणी गुंडगिरी व भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आपणच भयमुक्त करू. या घटनेनंतर शिर्डीत विखे समर्थक आणि महायुती पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत निषेध नोंदवला.