जम्मू-कश्मीरमधील पहलगम बैसरान घाटी येथे पर्यटकांवर लष्कर ए तयब्बा संघटनेच्या दि रजिस्टन्स फ्रंटने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अलिबागमधील मुस्लिम समाजाने केला. बाजारपेठेतील जामा मशिदीसमोर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते. त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेत शांततेत निषेध नोंदवला आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नसीम बुकबाइंदडर, वसीम साखरकर, अश्रफ घट्टे, मुश्ताक घट्टे, जाफर सय्यद, फरीद सय्यद, भाजप शहराध्यक्ष ॲड. अंकित बंगेरा, पोलीस उपअधीक्षक विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक किशोर साळे आदींची उपस्थिती होती.