मंत्री गिरीश महाजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकतायेत. असा पलटवार शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेनी केलाय. पेहलगाम हल्ल्यानंतर मी अतिरेक्यांची पाठराखण केली, महाराजांच्या भूमिका करत मी औरंगजेबाची बाजू घेतली. असा विपर्यास करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाजनांनी केला. मुळात मी पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नांगी ठेचली पाहिजे, देशवासीयांसोबत माझी ही तिचं भावना आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला पण पेहलगाम हल्ल्यावेळी धर्म विचारण्यात आला, ते का अन कशासाठी? याचा विचार आपण करणार आहोत का? देशांतर्गत कलह निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता का? या अनुषंगाने मी केलेलं ते वक्तव्य होतं. गोळीने एक माणूस मृत पावतो, पण त्या वक्तव्यातून जी अस्वस्थता जाणवते, त्यातून भडका उडाला तर अनेक घरांना आग लागू शकते. मात्र महाजन अंतरज्ञानी झाले अन त्यांनी भडकावू अन बेताल वक्तव्य केली. महाजनांनी भान राखावं अन मोदींच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकू नये. असा खोचक सल्ला कोल्हेनी दिला.