भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात उद्यानांची संख्या कमी असल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची वानवा असताना शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद या उद्यानात पालिकेने स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता पाण्याची टाकी उभारण्यासाठी परस्पर पोकलेनच्या मदतीने खड्डा खोदण्यास सुरुवात झाल्यावर येथील नागरिक खडबडून जागे झाले आहेत. नागरिकांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेऊन येथील मुलांचे उद्यानात खेळण्याचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी येथील पाण्याची टाकी बनविण्याच्या काम स्थगिती देत येथील मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.