Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा…” , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

भांडूपमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील मित्राची हत्या केली. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 02, 2026 | 03:07 PM
"कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा..." , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

"कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा..." , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

Follow Us
Close
Follow Us:
  • इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या
  • तीन अल्पवयीन ताब्यात
  • शवविच्छेदन अहवालामुळे या हत्येचे गूढ उकलले
Mumbai Crime News in Marathi : भांडुप परिसरात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची त्याच्याच शाळेतील मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धार्थ लोंढे (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालामुळे या हत्येचे गूढ उकलले.

भांडुप पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ तुळशेत पाडा परिसरात वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर सिद्धार्थ न सापडल्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी विहार तलाव परिसरात, मुलुंड पोलिसांच्या हद्दीत सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला. भांडुप परिसरातील मुले पोहण्यासाठी विहार तलावात जात असल्याने सिद्धार्थ पोहताना बुडाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली. त्यामुळे प्रथम अपमृत्यूची नोंद करण्यात आली.

मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली. अहवालात सिद्धार्थच्या फुफ्फुसात व पोटात पाणी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे नमूद होते. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत नव्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच्या एका मित्रासोबत पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या आधारे मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्ही चौघे पोहायला गेलो होतो आणि सिद्धार्थ बुडाला, असे त्याने सांगितले. इतर दोन मित्रांनीही सुरुवातीला हीच माहिती दिली.

मात्र शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांनंतर तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. अखेर तिन्ही अल्पवयीन मित्रांनी सिद्धार्थची हत्या केल्याची कबुली दिली. सिद्धार्थ आमच्यावर सतत दादागिरी करत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही त्याला तलावाजवळ बोलावले आणि मारहाण केली. या मारहाणीत काठीचा घाव डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह तलावात टाकल्याचे आरोपींनी कबूल केले. या प्रकरणातील तिन्ही अल्पवयीन आरोपींची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.

Ahmedabad Crime: होत्याचे नव्हते झाले! एकट्यात प्रेयसीला भेटण्याची ओढ, पण अचानक आले वडील; १२ वी च्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Web Title: Mumbai crime class 8 students kill school friend in bhandup latest marathi news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?

Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत
2

Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…
3

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…

Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
4

Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.