प्रतिकात्मक हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीला रवाना
चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा चा नारा देत भाजप नेते किरीट सोमय्या राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी रवाना झाले आहेत. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही मीडियाला दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. असं ते म्हणाले.