केंद्र सरकारकडून भगवानगडाला वनविभागाची 10 एकर जमीन देण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने महंत नामदेव शास्त्री यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी दरवर्षी प्रमाणे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर दाखल होत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. यावेळी नामदेव शास्त्री व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर उभारण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची पाहणी केली. तर भगवान गड ट्रस्टला शासनाने वनविभागाची जमीन दिल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील शासनाचे आभार मानले.