दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठा रंगबेरंगी सजावटीने उजळून निघाल्या आहेत. धुळे शहरातील आग्रा रोड भागात आज सकाळपासून नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसले. या बाजारपेठेत आकाश कंदील, रांगोळी, लक्ष्मीच्या मूर्ती आणि फटाक्यांनी विशेष आकर्षण निर्माण केले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत गर्दी थोडी कमी दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.दरम्यान, विविध प्रकारच्या आकाश कंदीलांसह इको-फ्रेंडली आकाश कंदीलांची मागणी यंदा नागरिकांमध्ये वाढलेली दिसत आहे, ज्यामुळे वातावरणात सणाची उब आणि उत्साह वाढवणारा ठसा उमटला आहे, असे व्यापारी शंखर गेवलाणी यांनी सांगितले.