अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला, पण एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण करता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नाराज न होता कामावर रुजू व्हावे व विलीनीकरणासाठी कामावर रुजू होऊन लढा चालूच ठेवावा, असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.