बार्शी तालुक्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना समाजातील दानशूर हात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, बार्शीतील श्री भगवंत देवस्थान यांच्या वतीने तब्बल १० लाख रुपयांचा मदतनिधी, तर बडवे समितीच्या वतीने २५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे व तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत, डॉ. बी. वाय. यादव, देवस्थान सरपंच दादा बुडूख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार एफ. आर. शेख, श्री भगवंत देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच बडवे समितीचे पदाधिकारी आणि श्री भगवंताचे समस्त पुजारी उपस्थित होते.