जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेत तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी 20 वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही महिला आढळून आली. तपासात ती कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून राहत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर लग्नासाठी कोणीका हिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मय वाला यांच्याविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. दरम्यान कोणीका आणि चिन्मय हे दोघेजण आम्ही लग्न केले असल्याचे सांगत आहेत. परंतु याबाबतचा त्यांच्याकडे कुठलाही पुरावा अद्याप तरी आढळून आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत.