धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात केला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कारभारावर त्यांनी जोरदार हल्लाबोल करत, बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराला काम देण्यात आल्याचा दावा केला. याप्रकरणी माहिती मागवूनही अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप करत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांऐवजी तुकाराम मुंडे यांच्यासारखा कठोर अधिकारी नेमण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.