कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग रचना सुनावणीदरम्यान २७ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या गावांमधील ३ हजारांहून अधिक हरकतींची दखल घेतली नसल्याचा आरोप करत खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट मागणी केली की, २७ गावे केडीएमसीत समाविष्ट न करता प्रभाग रचना व्हावी आणि या गावांमध्ये निवडणूक घेऊ नये. कारण हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयुक्तांनी याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.