भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
KDMC News Marathi: मनसे नेते राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांनी रस्ता व्यापला आहे.
निवडणूक आयोगाला केडीएमसी आणि नगरविकास खात्याचे अप्पर सचिवांना अहवाल सादर करावा आदेश आयोगाकडून देण्यात आले होते. केडीएमसीने अहवाल सादर न करता प्रभाग रचना अंतिम केली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील इतर गावांच्या भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदींमध्ये गंभीर तफावत दिसून आली. याचसंदर्भात तातडीने बैठक बोलविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
डोंबिवलीमध्ये एका सुरक्षारक्षकाने मुलांचे हात बांधून मारहाण केली आणि इमारतीसमोर फिरवल्याची घटना घडली. या प्रकरणी पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक राजेंद्र खंदारे विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे असून उद्योजक, सामाजिक संस्था, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून 17 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर... मनसे नेते राजू पाटील यांचा पालिकेवर गंभीर आरोप.
नवरात्रीच्या भंडाऱ्यात 13 वर्षाचा मुलगा जेवण करायला गेला होता. त्यावेळी बाजूला असलेले नाल्याचे झाकण उघडे होते. त्याचवेळी नजरचुकीमुळे अपघात झाला आणि हा मुगला नाल्यात पडला.
कल्याण -शीळ रस्त्यावरील महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. राजू पाटील यांनी दाखल केलेली याचिका उच्च…
स्थानिक नागरिकांचा हक्क, त्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न यांना न्याय मिळावा या उद्देशाने कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली.
Fake medicine stock seized : अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील एका रुग्णालयावर छापा टाकून तब्बल ५.१६ लाख रुपये किमतीची बेकायदेशीर औषधे जप्त केली आहेत. याचप्रकरणी आता रुग्णालयातून स्पष्टीकरण देण्यात…
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीला विरोध दर्शविला जात आहे. या नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर बंदची हाक दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. आज ते 75 व्या वर्षांत दाखल झाले. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याण केडीएमसीच्या प्रसुतीगृहात धक्कादायक घटना घडली. तसलीमा खातून या महिलेची प्रसूती झाली, मात्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला.