कल्याण येथील भाजप नगरसेवक पदाचे उमेदवार संजय मोरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे. मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, जलपुरवठा तसेच नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, विद्युत दिवे, भूयारी गटारे, शाळा इमारती, आरोग्य केंद्रे, तलाव आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या असल्याकडे लक्ष वेधत, या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे संजय मोरे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक बदल झाले असले तरी विकासाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.