
एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली!
छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील माळीचिंचोरे फाट्यानजिक असलेल्या हॉटेल धनश्री धाब्यावर अधिकृत बस थांबा नसतांनाही राज्य महामंडळाच्या बसेस या धाब्यावर सर्रास अनधिकृतपणे थांबत असून या थांबलेल्या बसमधील प्रवाशांना चालक-वाहक तटकळत बसून राहावे लागत आहे. या गोष्टीकडे राज्य परिवान महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून थांबा नसतांनाही बस थांबविण्याऱ्या चालक- वाहकांवर आता कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील रस्त्यांवर असलेल्या अनेक हॉटेल आणि धाब्यांवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बेकायदेशीरपणे सर्रास थांबत असून ‘त्या’ बदल्यात या बसमधील चालकांना मोफत नास्ता आणि जेवणाची सोय हॉटेल चालकांकडून केली जात असल्यामुळे निष्कारण प्रवाश्याना त्रास देण्याचा एक नवा उद्योग सरु झालेला आहे.
Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम
एसटी महामंडळाची बस सर्रास कोणत्याही हॉटेल किंवा धाब्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबलेल्या असल्याचे दिसून येत आहे. बसमधील प्रवाश्याना चहा नाष्टयासाठी आणि जेवण करण्यासाठी बस चालक आणि वाहकांना हाताशी धरल्यानंतर हे चालक महामंडळाचा नियम तोडून चक्क अनाअधिकृत थांबा तयार करत असल्यामुळे कायदा मोडणाऱ्या या चालक वाहकांवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला ज्या ठिकाणी थांबा नाही अश्या हॉटेल किंवा धब्यांवर बस थांचवीत असलेल्या चालक वाहकांना हॉटेल चालक मोफत जेवण आणि चिरीमिरीही देत असल्याची चर्चा असून त्या बदल्यात या बसमधील प्रवाश्यांकडून जादा पैसे आकारले जात असल्यामुळे या प्रवाश्यांना निष्करण वेळ आणि पैसा वाया घालणाऱ्या चालकांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त प्रवासी वर्गातून दिला जात आहे.
Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’; वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन
माळीचिंचोरे येथील हॉटेल धनश्री येथे अनधिकृतपणे चहा नाश्त्याला आणि जेवणासाठी बस थांबवून ‘त्या’ बदल्यात या हॉटेल चालकाकडून बसमधील चालक – वाहकांना मेजवानी दिली जात असून त्या मेजवानीची पैसे या बसमधील प्रवाश्यांकडून जादा पैसे घेऊन त्याची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गामधून केल्या जात आहे. चालकांवर कारवाई ण केल्यास आदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला जात आहे. आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त प्रवासी वर्गातून दिला जात आहे, असे सांगितले.