धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी ग्रामस्थांचा संताप अखेर पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात उफाळून आला. अनेक दिवसांपासून विविध समस्यांवर तक्रारी, आंदोलने आणि रास्ता रोको करूनही न्याय मिळाला नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला. महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावाला भेट देण्याचे आदेश दिले होते, मात्र ती भेट न झाल्याने ग्रामस्थ नाराज होते. अखेर कार्यक्रम सुरू असताना एका ग्रामस्थाने गोंधळ घातला, परंतु पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.