जीवनात अपयश आलं की, धडधाकट व्यक्ती देखील नशीबाला दोष देत बसतात. काहीजण तर आत्महत्येचा मार्ग निवडतात.अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याच काम कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या माउली आदूकर हिने केले आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे या छोट्या गावात राहणारी माउली हिला जन्मापासून दोन्ही हात नाहीत मात्र देवाने देण्यात कसूर केली तरी माऊलीनं मात्र जिद्दीत कसूर ठेवली नाही, नशिबाला दोष न देता तिने हे नियतीच आव्हान म्हणून स्वीकारलं. दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या माऊलीने हार्मोनियम शिकण्याची जिद्द बाळगली आणि चक्क पायाने हार्मोनियम वाजवण्याची कला तिने विकसित केली.