Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल

जामखेडमध्ये एकीकडे कागदोपत्री युरियाचा साठा भरपूर असल्याच्या नोंदी दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना खतासाठी केंद्र ते केंद्र भटकावे लागत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 08:57 PM
जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे?

जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे?

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेडमध्ये युरियाचा काळाबाजार
  • कागदोपत्री युरियाचा साठा भरपूर असल्याच्या नोंदी
  • मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळेना
वसंत सानप/जामखेड: शासनाकडून टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा होत असल्याचे अधिकृत नोंदी सांगतात. तालुक्यातील ४३ कृषी सेवा केंद्रांकडे अलीकडेच ५४० टन युरिया पोहोचल्याची नोंद आहे. याआधीच्या दोन महिन्यांत २५० टन खत वितरित झाले होते. म्हणजे एकूण सुमारे ७९० टनांचा साठा कागदोपत्री उपलब्ध आहे. तरी प्रत्यक्षात शेतकरी खतासाठी केंद्र ते केंद्र भटकताना दिसतो. “माल संपला”, “उद्या या”, “दुसरे खत घ्या” अशी उत्तरे का दिली जात आहेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

पारदर्शकतेचा अभाव?

खतांच्या दुकानांवर दरफलक स्पष्टपणे लावले आहेत का? रोजच्या विक्रीची नोंद सार्वजनिक पडताळणीसाठी उपलब्ध आहे का? कोणत्या केंद्राकडे किती साठा आहे, हे ऑनलाइन किंवा नोटीस बोर्डवर दर्शवले जाते का? या मूलभूत बाबींमध्ये पारदर्शकता नसल्यास शंका वाढणे स्वाभाविक आहे. पुरवठा झाला असला, तरी तो स्थानिक गरजेनुसार आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकला जातो का, हा खरा मुद्दा आहे.

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

बाहेरील शेतकऱ्यांचा मुद्दा — सोयीस्कर कारण?

काही कृषी सेवा केंद्रांकडून शेजारच्या तालुक्यातील शेतकरी अधिक दर देऊन खत खरेदी करतात, त्यामुळे स्थानिकांना तुटवडा भासतो, असे सांगितले जाते. मात्र खतविक्रीवर नियंत्रण यंत्रणा असताना असा अनियंत्रित बाह्य पुरवठा कसा होतो? ही बाब खरी असेल, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काच्या साठ्यावर डल्ला तर मारला जात नाही ना, असा सवाल उपस्थित होतो.

व्यवस्थेतील त्रुटी हेच खरे कारण

पुरवठा सुरळीत असूनही शेतकरी खांपासून वंचित राहत असेल, तर ही केवळ बाजारातील विसंगती नसून व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहे. आज प्रश्न खताचा नाही, तर विश्वासाचा आहे. शासन म्हणते साठा आहे, दुकानदार म्हणतो माल संपला. मग खरे कोण आणि चुकीचे कोण ? जामखेड तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी पारदर्शकतेने पुढे येऊन साठा व विक्रीची माहिती जाहीर केली नाही, तर टंचाई हा शब्दच संशयास्पद ठरेल.

कृत्रिम टंचाईचा संशय

जेव्हा मागणी वाढते, तेव्हा काही ठिकाणी पुरवठा थांबवून टंचाई निर्माण केली जाते आणि नंतर वाढीव दराने विक्री केली जाते. अशी पद्धत राज्यातील अनेक भागांत पूर्वी उघड झाली आहे. जामखेडमध्येही तशीच छुपी साखळी कार्यरत आहे का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कृषी सेवा केंद्रांनी रोजचा साठा आणि विक्री तपशील सार्वजनिक करणे आवश्यक असून, तालुका कृषी कार्यालयाने अचानक तपासण्या करून साठा पडताळणी करणे गरजेचे आहे. जिल्हा पातळीवर उड्डाण पथक नियुक्त करून तपासणी केली जावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Jamkhed farmers are desperate despite abundant urea stocks on paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या
1

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
2

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद
3

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती
4

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.