Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

अवैध दारू आणि वाढत्या चोऱ्यांच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील भोजदरी ग्रामस्थांनी शिवजयंतीला ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिला आंदोलकांची मोठी उपस्थिती दिसली.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 08:16 PM
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Follow Us
Close
Follow Us:

“बंद करा बंद करा, अवैध धंदे बंद करा”, “गावातील दारू बंद झालीच पाहिजे”, “चोऱ्यांना आळा बसलाच पाहिजे” अशा संतप्त घोषणांनी भोजदरी (पठार भाग) येथील ग्रामस्थांनी शिवजयंती दिनी (१९ फेब्रुवारी) ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

भोजदरी हे गाव संगमनेर तालुक्यातील दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असून, Pune-Nashik National Highway पासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. काही ठिकाणी शेततळ्यांमुळे टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळतो; मात्र अलीकडील चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; दडपशाहीचा आरोप, सभागृहातच खडाजंगी

शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला

चोरट्यांनी विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्यांमधील केबल, कृषी पंप यांसारख्या साहित्यांची चोरी सुरू केली आहे. याशिवाय गावात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही Ghargaon Police Station कडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. उलट तक्रार नोंदविताना नागरिकांना त्रासदायक प्रश्न विचारले जात असल्याची तक्रारही करण्यात आली. त्यामुळे अनेक चोरीच्या घटनांची नोंदच केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

आंदोलनाबाबत पूर्वसूचना देऊनही प्रशासनातील एकही अधिकारी किंवा पोलिस प्रतिनिधी आंदोलनस्थळी न आल्याने संताप अधिकच वाढला. प्रशासन अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.

महिलांची मोठी उपस्थिती

या ठिय्या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळेच चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. काही घरांत तर चोरट्यांनी स्वयंपाकघरातील भांडीसुद्धा चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ कारवाई करून अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करावी, तसेच चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लवकरच घारगाव पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Ahilyanagar news protest on shivjayanti by bhojdari villagers to limit crimes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल
1

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती
2

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर
3

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह
4

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.