लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.2016 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली होती. 2017 निवडणुका झाल्या होत्या.पहिल्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ.. आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळते. भाजप …शिवसेनेचे दोन्ही गट ..काँग्रेस.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अकरा लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळते.
.