Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! ‘या’ जातील विशेष मागणी

पाथर्डी येथील कानिफनाथ यात्रेत भरलेल्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा विविध ठिकाणांहून आलेल्या गाढवांनी मोठा भाव खाल्ला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 09:10 PM
Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! 'या' जातील विशेष मागणी

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! 'या' जातील विशेष मागणी

Follow Us
Close
Follow Us:

यांत्रिकीकरणाच्या युगातही गाढवांचे महत्त्व आजही कायम आहे. Shree Kshetra Madhi येथे भरलेल्या Kanifnath Yatra दरम्यान आयोजित प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा गाढवांना मोठा भाव मिळत आहे. राज्यातील विविध भागांतून व्यापारी आणि ग्राहक येथे दाखल झाले आहेत. मात्र यंदा विक्रेत्यांची संख्या कमी आणि खरेदीदार जास्त असल्याने गाढवांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

राज्यातील सर्वांत मोठ्या गाढव बाजारात यंदा केवळ सुमारे 200 गाढवे विक्रीसाठी आणण्यात आली. विशेष म्हणजे Kathiawar परिसरातील काठेवाडी जातीच्या गाढवांना मोठी मागणी आहे. या बाजाराचे आयोजन फाल्गुन कृष्ण चतुर्थी, रंगपंचमी आणि नाथषष्ठी या तीन दिवसांत केले जाते आणि हा बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे.

यंदा गावरान गाढवांची किंमत 10 हजार ते 40 हजार रुपये इतकी आहे, तर काठेवाडी (गुजराती) गाढवांची किंमत 30 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किंमतीत मोठी वाढ झाल्याचे व्यापारी अविनाश उर्फ सोनू बोरुडे (बेलापूर) यांनी सांगितले. त्यांच्या मते, गाढवांची आवक कमी झाल्याने मागणी वाढली आणि त्यामुळे भावही गगनाला भिडले आहेत.

राज्यात चार ठिकाणी भरतो गाढवांचा बाजार

महाराष्ट्रात वर्षातून एकदाच चार ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. यामध्ये Deulgaon Raja, Jejuri, Madhi आणि Malegaon या ठिकाणांचा समावेश आहे. त्यापैकी मढी येथील बाजार हा सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध मानला जातो.

आजही गाढवांचा उपयोग वीटभट्ट्यांवर माती आणि वाळू वाहतूक, तसेच गड-किल्ले आणि डोंगराळ भागात सामान पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच गाढवाचे दूध लहान मुलांच्या औषधांसाठीही वापरले जाते.

दुर्गम भागात गाढवच ठरते विश्वसनीय

यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टर आणि ट्रकसारखी साधने उपलब्ध असली तरी दुर्गम आणि डोंगराळ भागात गाढवच अधिक विश्वासार्ह ठरते. अशा भागांत मशीन पोहोचू शकत नाहीत. गुजरातमधील काठेवाड प्रदेशातील गाढवे मजबूत आणि टिकाऊ समजली जात असल्याने त्यांची मागणी सर्वाधिक असल्याचे व्यापारी अमोल धोत्रे यांनी सांगितले. यात्रेनिमित्त भरलेल्या या बाजारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.

गाढवाची किंमत कशी ठरते?

गाढवाची जात, प्रकृती आणि वय यावर त्याची किंमत ठरते. प्रामुख्याने गाढवाच्या दातांवरून त्याचे वय ओळखले जाते आणि त्यानुसार बाजारभाव ठरवला जातो. काठेवाडी जातीची गाढवे उंची व लांबीने मोठी आणि दिसायलाही आकर्षक असतात. तसेच त्यांची माल वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने व्यापारी त्यांना अधिक पसंती देतात, असे व्यापारी दादू गोटीराम शिंदे यांनी सांगितले.

खरेदीदारांची द्विधा मनस्थिती

यंदा गाढवांच्या किंमती मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाल्याने खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. गाढवांची मागणी वाढली असली तरी आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदार काहीसे संभ्रमात असले तरी कामासाठी गाढव आवश्यक असल्याने अधिक पैसे देऊन खरेदी करावी लागत असल्याचे मारुती पवार (फलटण) यांनी सांगितले.

Web Title: Ahilyanagar news madhi kanifnath maharaj donkey demand rises in donkey market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

New Overtime Rules: Salary च्या दुप्पट दराने मिळणार Overtime चे पैसे; कामाच्या तासांबाबत सरकारचा नेमका काय निर्णय?
1

New Overtime Rules: Salary च्या दुप्पट दराने मिळणार Overtime चे पैसे; कामाच्या तासांबाबत सरकारचा नेमका काय निर्णय?

रॉकेटसारखा वेग, तुफान अंदाज…, जाणून घ्या ‘या’ कारबद्दल जी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळात पकडते 100 चं स्पीड
2

रॉकेटसारखा वेग, तुफान अंदाज…, जाणून घ्या ‘या’ कारबद्दल जी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळात पकडते 100 चं स्पीड

उलगडणार ‘Tumbbad 2 ’ च्या दुनियेतील मोठे रहस्य, प्रतिक्षा संपली; सोहम शाहचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

उलगडणार ‘Tumbbad 2 ’ च्या दुनियेतील मोठे रहस्य, प्रतिक्षा संपली; सोहम शाहचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर
4

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.