राज्य सरकार वनविभागाचे मुख्यालय नागपूरहून मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन केलं. विदर्भात राज्यातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असल्याने वन विभागाचे मुख्यालय नागपुरातच असावे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. घोषणाबाजी, निदर्शने आणि राज्य सरकारविरोधी घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. वनविभागाचे मुख्य कार्यालय विदर्भातून हलवू नये, अशी मागणी समितीचे कार्यकर्ते मुकेश मसुरकर यांनी केली.