नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ तुटपुंजी मदत दिली जात असून, मराठवाड्यात ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती वडेट्टीवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे जमीनीचे नुकसान आणि जनावरांचे मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत देण्याची आवश्यकता होती, मात्र NDRFच्या निकषानुसार मिळणारी मदत अपुरी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी मिळणार आहे का, शेतकरी व शेतमजूर दोघांनाही न्याय मिळेल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शिवाय, कर्जमाफीची घोषणा वारंवार पुढे ढकलली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मराठा आरक्षणासह राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेबाबतही त्यांनी मत व्यक्त करत, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.