Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
मुंबई: नवभारत वृत्त समूहाच्या ‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ चे आयोजन मुंबईतील विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे करण्यात आले. या कार्यक्रमात, इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) आणि रिअल इस्टेट (स्थावर मालमत्ता) क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान करण्यासाठी नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.