पाकिस्तानाकडून सध्या देशात भ्याड हल्ले केले जात असल्याने सतर्क झालेल्या पालघर पोलिसांनी पश्चिम किनारपट्टीवरील 83 किलोमीटरच्या परिसरात 38 लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी चौक बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच पश्चिम किनारपट्टी लगतच्या सर्व तपासणी नाक्यावर सध्या पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच समाज माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करावा असं आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघरच्या नागरिकांना केलं आहे . तपासणी नाक्यांसह पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या हॉटेल आणि लॉज ची देखील कसून तपासणी पालघर पोलिसांकडून सुरू करण्यात आली असून संशयित हालचाली दिसल्यास पालघर पोलिसांनी दिलेल्या 112 या नंबरला माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं देखील यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले आहेत.