परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तेरा वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर संबंधित आरोपीवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला. लैंगिक अत्याचार करणाऱ्या पीडित कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबीयांकडून धमकावण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यामुळे चिडलेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले. मोठ्या संख्येने आलेल्या बंजारा बांधवांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सदरील आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच आरोपीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याविषयी विस्तृत माहिती अशी की, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे बंजारा बांधवांची वस्ती आहे. याच वस्तीवर राहणाऱ्या 13 मुलगी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान गावांमधून दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. रस्त्याने जात असताना शेजारी राहणाऱ्या आरोपी दीपक भोसले याने या मुलीला आपल्या घरात ओढले. आणि या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.त्यामुळे चिडलेल्या बंजारा बांधवांनी थेट आज जिल्हाधिकारी कार्यालयात घातले. पीडित मुलीला न्याय मिळवून द्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांना सर्व व्यथा सांगण्यात आली. मोठ्या संख्येने बंजारा बांधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्याने मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बंजारा बांधवांनी आपला आक्रोश देखील व्यक्त केला.