अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कदम यांनी मतदारांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीला प्राधान्य देत माणूसकी जपून मतदान करावे, असे आवाहन केले. निवडणूक कधीच सोपी नसते, प्रतिस्पर्धी उमेदवार मित्र असले तरी संघर्ष अटळ असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादीचे उमेदवार गायत्री कदम व निलेश कदम विजयी होतील, असा दावा केला. दरम्यान, पंचायत समिती उमेदवार निलेश कदम यांनीही मतदार योग्य निर्णय घेतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी संबंधित उमेदवारांशी संवाद साधला.