Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन

नेरळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत दौड आयोजित केली जाते.यावर्षी पुणे जिल्ह्यातील कोरीगड येथून शिवज्योत नेरळ येथे आणण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 03:48 PM
Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवजयंतीचा उत्साह शिगेला
  • 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत दौड आयोजित केली जाते. यावर्षी पुणे जिल्ह्यातील कोरीगड येथून शिवज्योत नेरळ येथे आणण्यात आली. नेरळ शिवज्योत दौड समितिचे हे यावर्षीचे 12 वे वर्षे आहे. कर्जत तालुक्यातून नेरळ येथे तिथीप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने शिवज्योत दौड समिती कडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ले येथून शिवज्योत आणली जाते. यावर्षी पुणे जिल्ह्यातील कोरीगड येथून शिवज्योत नेरळ येथे आणण्यात आली. शिवज्योत दौडीत प्रथमेश कर्णिक, शुभम कडू, दुर्वांकुर पवार, चिराग कडू, तन्मय दिसले, राहुल साळुंके, तुषार भोईर, भावेश भोईर, कुणाल कांबरी, विनायक भोईर, वेदांत शिंदे, केतन भोईर, कामेश कांबरी, आदित्य भोईर, वैभव कांबरी, जीवन भोईर, श्याम कडव, संतोष राठोड, निखिल धुळे, भूषण भोईर, सुदर्शन भोईर, प्रथमेश देशमुख, राजेश हाबळे, शिरीष भोईर आणि निखिल खडे या शिवभक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव 2026 निमित्त शिवजयंती उत्सव समिती नेरळ 2026-27 च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शिवज्योत दौडीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्याची परंपरा समितीने यंदाही उत्साहात आणि भक्तिभावाने जपली.

यावर्षी पुणे जिल्ह्यातील कोरीगड किल्ल्यावरून नेरळपर्यंत शिवज्योत दौड काढण्यात आली. सुमारे ७० किमी अंतराचा हा प्रेरणादायी प्रवास नेरळ परिसरातील अनेक शिवभक्तांनी एकत्रितपणे पूर्ण केला. शिवभक्तांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही पवित्र शिवज्योत नेरळमध्ये आणण्यात आली. यापूर्वीही समितीच्या वतीने रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, रामशेज किल्ला, सिंहगड किल्ला, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, लोहगड किल्ला, कुलाबा किल्ला आणि संग्रामदुर्ग अशा विविध ऐतिहासिक किल्ल्यांवरून यशस्वी शिवज्योत दौडी काढण्यात आल्या आहेत. यंदा कोरीगड किल्ल्यास शिवपुष्प अर्पण करून शिवभक्तांनी ही प्रेरणादायी दौड यशस्वीरित्या नेरळपर्यंत पूर्ण केली.

आदिवासी वाडीची तहान भागली! स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर कोरळवाडीत पाणी; आमरण उपोषण अखेर यशस्वी

या शिवज्योत दौडचे नेरळ गावात आज सकाळी आगमन झाले.त्यानंतर या शिवज्योत दौडमध्ये सहभागी झालेले तरुण यांची आपली दौड नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विसर्जित केली. त्यावेळी शिवज्योत दौड मध्ये सहभागी झालेल्या सर्व तरुणांचे नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. खरे पाहता शिवज्योत दौड हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून, एका हातातून दुसऱ्या हातात शिवज्योत हस्तांतरित करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे तरुण पिढी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत असल्याने समाजात इतिहासाची जाणीव आणि स्वराज्याची प्रेरणा जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडत आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Web Title: Karjat news shiv jayanti excitement at its peak shiv jyoti arrives after traveling 70 kilometers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा
1

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर
2

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला
3

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा
4

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.