जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस उलटले असले तरी अद्याप सत्ता स्थापनेबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही. ६५ जागांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३३ जागांची गरज आहे. निकालानुसार भाजपाने २७ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २० जागा, तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई कोणती भूमिका घेणार, नैसर्गिक युती कायम ठेवणार की राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.साताऱ्यातील राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून, पुढील काही दिवसांत सत्ता समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.