आगामी पुणे महानगरपालिकेची (PMC) निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा स्पष्ट आदेश दिला असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.प्रशांत जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन पुणे महानगरपालिकेच्या राजकीय परिस्थितीचा सविस्तर लेखाजोखा सादर केला. यामध्ये महाविकास आघाडीसोबत लढल्यास होणारे फायदे आणि इतर पक्षांशी युती करण्याच्या पर्यायांवर चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.